फिरोजाबाद : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय एजंटला माहिती पुरवणारा फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरीतील चार्जमन रवींद्र कुमार याला अटक झाली आहे. त्याच्या अटकेनंतर त्याच्या भागात राहणा-या लोकांना धक्का बसला आहे. तो सोशल मीडियावर चित्रपटांची गाणी आणि व्हीडीओ शेअर करत होता. त्याला गल्लीतील लोक मिथुन म्हणत होते. फिरोजाबाद ऑर्डनन्स फॅक्टरीतील जंगलात त्याने अनेक व्हीडीओ बनवले होते. ते सोशल मीडियावर शेअरसुद्धा केले होते.
रवींद्र कुमार याने गेल्या दीड वर्षांपासून सर्वांसोबत असलेले संपर्क तोडून टाकले. त्याची पत्नी आरती आणि मुलेसुद्धा कोणाशी संपर्क ठेवत नव्हते. त्याच्यासोबत त्याची पत्नी, दोन मुले आणि आई राहते. दहा वर्षांपूर्वी तो फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीस लागला. त्यापूर्वी त्याने अप्रेंटिस केली होती. त्याचे वडील आर्मीच्या वर्कशॉपमध्येच कामाला होते. नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
कसा अडकला जाळ्यात?
रवींद्र कुमार हा पाकिस्तानी महिलेच्या हनीट्रॅपमध्ये सापडल्याचे तपासातून समोर आले आहे. पाकिस्तानच्या आयएसआयच्या महिला एजंटने सोशल मीडियाच्या माध्यमातून रवींद्र कुमार याच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याच्याकडून माहिती घेवू लागली. हळहळू संवेदनशील माहिती ती जमा करू लागली. तिच्या जाळ्यात रवींद्रकुमार फसत गेला.
काय काय मिळाले?
रवींद्र कुमार याला अटक केल्यानंतर त्याचा फोन जप्त करण्यात आला. त्यात अनेक गोपणीय कागदपत्रे मिळाली. त्यात फॅक्ट्रीचा उत्पादन रिपोर्ट, ड्रोन आणि अन्य संरक्षण उपकरणांची माहिती, भारतीय सैना आणि अधिका-यांची बैठकांची माहिती, फॅक्टरीतील स्टॉक लिस्ट, संवेदनशील कागदपत्रे मिळाली. ड्रोन आणि इतर संरक्षण सामग्रुची माहिती त्याच्याकडे होती.
नेहाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले
रवींद्र याने तपासात सांगितले की, जून २०२४ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून नेहा शर्मा या मुलीची ओळख झाली. ते फेसबुकनंतर मॅसेंजरवर बोलू लागले. त्यानंतर तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. व्हॉट्सऍप नंबर दिला. मग व्हॉट्सऍपवर त्यांचे बोलणे होऊ लागले. नेहाने त्याला सोबत काम करत राहिल्यास तुला मालामाल करेल, असे सांगितले. त्यानंतर लालच देऊन ऑर्डनन्स फॅक्टरीची माहिती घेऊ लागली. तिला माहिती पाठवल्यावर ती तो डिलीट करत होता.