24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीययूरोपात इस्लामला जागा नाही

यूरोपात इस्लामला जागा नाही

रोम : इस्लामिक संस्कृती आणि यूरोप कल्चरमध्ये काहीही साम्य नाही. त्यामुळे यूरोपात इस्लामला काही जागा नाही. इटलीच्या इस्लाम सांस्कृतिक केंद्रांना सौदी अरबकडून फंडिग होत आहे. जिथे शरिया कायदा लागू आहे. यूरोपाचे इस्लामीकरण सुरू आहे जे आमच्या सभ्यतेच्या मूल्यांपासून दूर आहे. त्यामुळे मुस्लिमांनी यूरोपापासून दूर राहावे असे वादग्रस्त विधान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी केले आहे.

पंतप्रधान मेलोनी म्हणाल्या की, आमची सभ्यतेचे मूल्य आणि इस्लामी मूल्य यामध्ये साधर्म्य नाही. या दोन्ही संस्कृती परस्परविरोधी आहेत असे त्यांनी सांगितले. जॉर्जिया मेलोनी यांचे हे विधान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या वक्तव्यानंतर समोर आले आहे. बेकायदेशीर प्रवाशांपासून यूरोपीय संस्कृतीला धोका असल्याचे सुनक यांनी म्हटले होते. पंतप्रधान ऋषी सुनक हे अलीकडेच इटली दौ-यावर आले होते. त्यावेळी अवैधरित्या यूरोपमध्ये वाढणा-या प्रवासी संख्येवर त्यांनी भाष्य केले. अवैध प्रवाशांकडून यूरोपमध्ये वाढणा-या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात असे त्यांनी म्हटले.

जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिला महिला पंतप्रधान आहेत. त्या दक्षिणपंथी पार्टी ब्रदर्स ऑफ इटलीच्या नेत्या आहेत. ३१ व्या वर्षी इटलीत सर्वात युवा मंत्री बनण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. आपल्या विधानांमुळे मेलोनी कायम चर्चेत राहतात. मेलोनी स्वत:ला मुसोलिनीचे वारस असल्याचे सांगते. ज्यावर अनेकदा त्यांना टीका सहन करावी लागली आहे. एका विधानात जॉर्जिया यांनी मुस्लीम इटलीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. जॉर्जिया मेलोनी यांचं खासगी जीवनही ब-याचदा चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एंड्रिया गिआम्ब्रुनो यांच्याशी नाते संपवले. जवळपास १० वर्षानंतर मेलोनीने ब्रेकअप केल्याचे जाहीर केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR