28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयइस्राईल भारताचा वापर करतोय : पिनराई विजयन

इस्राईल भारताचा वापर करतोय : पिनराई विजयन

तिरुअनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पुन्हा एकदा पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. तसेच त्यांनी मागणी केली आहे की, भारत सरकारने तात्काळ इस्राईलसोबतचे लष्करी आणि संरक्षण करार थांबवावेत. इस्राईलबाबत भाजपचे जे धोरण आहे ते देशाची भूमिका होऊ शकत नाही. तसेच इस्राईल भारताचा वापर करत आहे असेही म्हणाले.

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी सांगितले की, आमचे समर्थन पॅलेस्टाईनसोबत आहे. कृपया इस्राईलला पाठिंबा देण्याच्या भाजपच्या धोरणाचा भारताची भूमिका असा अर्थ लावू नका. भारताने इस्राईलसोबतचे लष्करी आणि संरक्षण करार थांबवण्याची गरज आहे. इस्राईल भारताचा वापर पॅलेस्टाईनविरुद्ध शस्त्र म्हणून वापर करत आहे, असे ते म्हणाले. विजयन यांनी ७ नोव्हेंबर रोजी युद्धग्रस्त पॅलेस्टिनींचे समर्थन केले आणि म्हटले होते की, जेंव्हा लोकांचा एक भाग नरसंहारासारख्या आक्रमकतेचा सामना करत आहे, तेंव्हा कोणीही तटस्थ भूमिका दाखवू शकत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR