तेल अवीव : हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी गाझामधील रफाह भागात घुसलेल्या इस्रायली सैन्याविरुद्ध आमचा देश कोणतेही तडजोड करणार नाही आणि कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, आम्हाला हमासचा पूर्णपणे खात्मा करायचा आहे.
असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.नेतान्याहू यांचे हे विधान अशा वेळी आले आहे. ज्यावेळी रफाहमध्ये इस्रायलच्या मोहिमेविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दबाव वाढत आहे. अमेरिका आणि इतर देशानी राफावरील हल्ला विनाशकारी असल्याचे म्हटले आहे, मात्र इस्रायल या दबावाला झुकणार नाही, आपली कारवाई सुरूच ठेवेल असेही नेतान्याहू यांनी म्हटले.
दरम्यान इस्रायलचे सैन्य रफाहमध्ये घुसण्यापूर्वी तेथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही योजना आखली होती, त्यानुसार त्यांना बाहेर काढण्यात येत येत असल्याचेही इस्रायलने म्हटले आहे. इजिप्तच्या गाझा सीमेवर असलेल्या रफाह ताब्यात घेतल्याशिवाय हमासलाचा रोखले जाऊ शकत नाही. उरलेल्या १३४ ओलिसांपैकी काहीजण रफाहमध्ये असल्याचे समजते आणि हमासनेही या भागात आश्रय घेतला आहे. रफाहा हमासचा शेवटचा गड आहे, आम्ही युध्द हारणार नाही. असेही बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.