21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयगाझामध्ये इस्रायलचे तांडव

गाझामध्ये इस्रायलचे तांडव

संपूर्ण कुटुंब केले नष्ट

उत्तर गाझा : गाझामधील इस्रायलचा कहर थांबण्याचे नाव नाही. इस्रायलकडून सातत्याने होणा-या हवाई हल्ल्याने गाझा बेचिराख झाला आहे. नुकतेच, उत्तर गाझातील इस्रायली हवाई हल्ल्यात एका मुलाचे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले. आता त्याच्या कुटुंबात केवळ तो एकटाच उरला आहे. त्याच्या शेजा-याने त्याला हातात उचलून धरले होते. याशिवाय, बेत हनूनमधील इतर लोक इस्रायलच्या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी परिसर सोडून दुस-या ठिकाणी केले आहेत.

या घटनेचा व्हीडीओदेखील समोर आला आहे. हा व्हीडीओ १२ नोव्हेंबरचा आहे, यात, संबंधित शेजारी मुलाला हातात धरून आदल्या रात्रीचा भयावह प्रसंगसांगत आहेत. तो अत्यंत दु:खी होऊन म्हणाला, हा मुलगा त्याच्या कुटुंबात एकटाच उरला आहे. याचे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले आहे. हे मूलही पूर्णपणे भाजले आहे. हा केवळ एकच उरला आहे.

संबंधित शेजारील व्यक्तीने सांगितले की ते (इस्रायली सैनिक) अचानकपणे जबरदस्त गोळीबार आणि स्फोट होत असतानाच आमच्या घरात शिरले. केवळ हा मुलगाच वाचला आहे. दरम्यान, परिसरातील ढिगा-यातून या मुलाचे रेस्क्यू करण्यात आले. गाझा सिव्हिल डिफेन्सच्या म्हणण्यानुसार, बेत हानूनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झला आहे. तर शेकडो कुटुंबांना शहर सोडावे लागले आहे. ते शहरसोडून इतरत्र जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR