मुलांना हिवाळ्यात ‘फ्लू लस’ देणे गरजेची

मुंबई : हिवाळ्यातील वाढत्या थंडीबरोबरच लहान मुलांना सर्दी, खोकला आणि फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण देखील वाढते. तापमानात झालेला बदल आणि कमी झालेली प्रतिकारशक्ती यामुळे मुलांना फ्लूचा त्रास होतो. त्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला मुलांचे फ्लू लसीकरण करणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरते.

याच संदर्भात डॉ. संजू सिदाराद्दी, बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणतात की हिवाळा जवळ आला असून पालकांनी आपल्या मुलांची नियमित वैद्यकीय तपासणी आणि फॉलो-अप करून त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय फ्लू लसीकरण मुलांसाठी महत्त्वाचे असून ते वगळू नये.

हिवाळ्यात बहुतेकदा नाक वाहणे, खोकला आणि ताप येणे, घसा खवखवणे आणि थकवा अशा समस्या आढळून येतात. हे सामान्य असले तरी लहान मुलांमध्ये हे ब-याचदा गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतात कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पुर्णत: विकसित झालेली नसते. शिवाय, हंगामी इन्फ्लूएंझा किंवा फ्लू शाळा आणि खेळाच्या मैदानांतून सहज पसरतो. ज्यामुळे उच्चदाब, अंगदुखी आणि कधीकधी न्यूमोनिया किंवा ब्राँकायटिस, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. काही मुलांना त्वरित व्यवस्थापन आणि पुनर्प्राप्तीसाठी रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.

संसर्गांपासून वाचवण्याचा प्रभावी मार्ग
फ्लू लस ही मुलांना संसर्गांपासून वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. पाच वर्षाखालील मुले आणि दमा किंवा मधुमेह सारख्या पूर्व-अस्तित्वातील आजार असलेल्यांना फ्लूशी संबंधित गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. लसीकरण केवळ मुलाला निरोगी ठेवत नाही तर कुटुंबातील सदस्यांना आणि वर्गमित्रांना विषाणू पसरण्यापासून देखील प्रतिबंधित करते. बरेच पालक लसीकरणाच्या फायद्यांकडे दुर्लक्ष करतात आणि गैरसमजुतींमुळे किंवा दुष्परिणामांच्या भीतीमुळे लसीकरण वेळापत्रक पाळण्यात अयशस्वी होतात. ही लस सुरक्षित असून सहसा हात दुखणे किंवा थोडा ताप यांसारख्या सौम्य प्रतिक्रिया दिसून येतात आणि त्यानंतर दोन दिवसांतच मुलांना बरे वाटू लागते. हिवाळा सुरू होण्यापूर्वीच तुमच्या मुलांना फ्लू लसीकरण करून सुरक्षित ठेवता येईल.

पालकांना सूचना
लसीकरणाव्यतिरिक्त, पालकांनी मुलांना वैयक्तिक स्वच्छता राखण्यास, नियमित हात धुण्यास, आजारी लोकांशी संपर्क टाळणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांनी समृद्ध असा पुरक आहार घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. लहान मुलांना किमान ७ ते ८ तास पुरेशी झोप मिळावी तसेच मुलांच्या शारीरिक हालचालींना पालकांनी प्रोत्साहन द्यावे. हिवाळ्यात मुलांना उबदार कपडे घाला, त्यांना पाणी, सूप, लिंबू पाणी देऊन हायड्रेटेड ठेवा आणि संसर्ग टाळण्यासाठी खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात अथवा रुमाल ठेवण्याची सवय लावा. लक्षात ठेवा, लसीकरण केवळ त्या मुलाचेच नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या वावरणा-या इतरांचेही रक्षण करते, आजारपणामुळे शाळा बुडणे आणि प्रकृती ढासळणे टाळता येते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
00:00
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news