31.1 C
Latur
Thursday, May 8, 2025
Homeअंतरराष्ट्रीयकुटुंबाऐवजी मी गेलो असतो तर बरं झाले असते

कुटुंबाऐवजी मी गेलो असतो तर बरं झाले असते

जैशच्या मसूद अझहरची प्रतिक्रिया

लाहौर : कंदहार विमान अपहरणाचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याने म्हटले की, बहावलपूरमधील भारतीय हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य आणि ४ सहकारी मारले गेले आहेत. एका वृत्तानुसार मसूद अझहरने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की मारल्या गेलेल्यांमध्ये त्याची मोठी बहीण आणि तिचा पती, मसूद अझहरचा पुतण्या आणि त्याची पत्नी, मसूदची भाची आणि तिची ५ मुले यांचा समावेश आहे.

दहशतवादी मसूदचे तीन जवळचे सहकारीही मारले गेल्याचे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, एका सहका-याच्या आईचेही निधन झाले आहे. भारताने बहावलपूरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात जैशचा मरकज सुभान अल्लाह तळ उद्ध्वस्त केला आहे. भारताने बहावलपूरमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात जैशचा मरकज सुभान अल्लाह तळ उद्ध्वस्त केला आहे.

संसदेवरील हल्ल्याव्यतिरिक्त, अझहर पठाणकोट-पुलवामा हल्ल्याचाही मास्टरमाइंड आहे. अझहर भारतात फक्त एकच नाही तर अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार आहे. संसदेवरील हल्ल्याव्यतिरिक्त, मसूद हा २०१६ च्या पठाणकोट हल्ल्याचाही मास्टरमाइंड आहे.
या प्रकरणातील दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, मसूदने भारतावर हल्ले करण्यासाठी जैश-ए-मोहम्मदच्या कार्यकर्त्यांचा वापर केला होता.

त्याने २००५ मध्ये अयोध्येतील रामजन्मभूमीवर आणि २०१९ मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. याशिवाय, २०१६ मध्ये उरी हल्ला आणि अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ येथील भारतीय वाणिज्य दूूतावासावरील हल्ल्यासाठीही मसूद जबाबदार आहे. अझहर हा अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेन आणि तालिबान संस्थापक मुल्ला उमर यांचा जवळचा मित्र होता.

मसूद १९९४ मध्ये पहिल्यांदा भारतात आला होता
मसूद अझहर पहिल्यांदा २९ जानेवारी १९९४ रोजी बांगलादेशहून विमानाने ढाकाहून दिल्लीला पोहोचला. १९९४ मध्ये अझहरने बनावट ओळखपत्र वापरून श्रीनगरमध्ये प्रवेश केला. हरकत-उल-जिहाद अल-इस्लामी आणि हरकत-उल-मुजाहिदीन गटांमधील तणाव कमी करणे हा त्याचा उद्देश होता. दरम्यान, दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल भारताने त्याला अनंतनाग येथून अटक केली. तेव्हा अझहर म्हणाला होता- काश्मीर मुक्त करण्यासाठी १२ देशांमधून इस्लामचे सैनिक आले आहेत. आम्ही तुमच्या कार्बाइनला रॉकेट लाँचरने उत्तर देऊ. चार वर्षांनंतर, जुलै १९९५ मध्ये, जम्मू आणि काश्मीरमध्ये सहा परदेशी पर्यटकांचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी पर्यटकाच्या बदल्यात मसूद अझहरची सुटका करण्याची मागणी केली. दरम्यान, ऑगस्टमध्ये दोन पर्यटक अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाले. तथापि, उर्वरित लोकांबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR