28.6 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमहाराष्ट्रजय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा

पुणे : अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात संपन्न झाला. साखरपुड्याला अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय ज्यामध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य होते.

पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये साखरपुडा सोहळा संपन्न झाला. सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितांनाच बोलवण्यात आले होते. आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य आरास आणि पारंपरिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला.

या साखरपुड्यासाठी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी पांढ-या रंगाचे आऊटफिट परिधान केले होते. जय पवार यांच्या होणा-या पत्नी पवार कुटुबांच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साता-यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित असून जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR