25.8 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रजयदीप आपटेला जामीन मंजूर

जयदीप आपटेला जामीन मंजूर

मालवण येथील पुतळा दुर्घटना प्रकरण

मालवण : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी उच्च न्यायालयाने जयदीप आपटे याला जामीन मंजूर केला आहे. प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आता आपटेला कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नसल्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम याप्रकरणी लागू शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

मालवण येथे राजकोट किल्ला परिसरात शिवरायांचा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ मध्ये कोसळला होता. अवघ्या आठ महिन्यांतच पुतळा कोसळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता. या घटनेनंतर पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट असल्याचे उघड झाले होते. पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण येथून अटक करण्यात आली होती.

पुतळा कोसळल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील चेतन पाटील या आरोपीला उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच जामीन मंजूर केला होता. आता या प्रकरणातील दुसरा आरोपी जयदीप आपटे यालादेखील मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टात सुनावणीवेळी आपटेचे वकील यांनी, निविदेतील अटीनुसार पुतळ्याच्या बांधकामाकरिता लागणा-या साहित्यासाठी आपटे याने ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR