27.6 C
Latur
Monday, May 27, 2024
Homeमनोरंजनजान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचा टीझ रिलीज

जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचा टीझ रिलीज

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आगामी ‘उलझ’ या चित्रपटामध्ये मध्ये दिसणार आहे. आज उलजचा टीझर रिलीज झाला असून, हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. असे चित्रपटाचा टीझर पाहून वाटत आहे. यासोबतच या चित्रपटात जान्हवी कपूर एका तरुण भारतीय राजदूताच्या भूमिकेत दिसत आहे. उलझच दिग्दर्शन सुधांशू सारिया यांनी केले असून, या चित्रपटाचा टीझर काही तासांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे, त्यानंतर जान्हवीचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक दिसत आहेत आणि जान्हवीचे सतत अभिनंदन करत आहेत.

जान्हवीने गेल्या वर्षी उलझची शूटिंग सुरू केले होते, ज्याची माहिती तिने सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली होती. शेअर केले जान्हवीने उलझमध्ये भारतीय राजदूताची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा पूर्णपणे देशभक्तीवर आधारित आहे. या चित्रपटाची कथा तरुण अधिकारी सुहाना (जान्हवी कपूर) भोवती फिरताना दिसणार आहे. या चित्रपटात सुहाना देश आणि तिच्या विरोधात रचलेल्या षडयंत्रामध्ये गुंतलेली दिसत आहे. उलजचा टीझर सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला असून, टीझरची सुरुवात सारे जहाँ से अच्छा या गाण्याने होते.

कोणकोणते कलाकार आहेत अलझमध्ये ?

उलझमध्ये जान्हवी कपूरशिवाय गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू, राजेश तैलंग, मियांग चांग, ​​सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमृता पांडे आणि विनीत जैन या चित्रपटाचे निमार्ते आहेत. हा चित्रपट ५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. उलझ व्यतिरिक्त जान्हवी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटातही दिसणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR