बीजिंग : भारताला बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान पुरविणा-या जपानने चक्क सहाव्या पिढीचे जेट फायटर तयार करण्यासाठी भारताला निमंत्रण दिले आहे. हा आंतरराष्ट्रीय प्रस्ताव जपानने भारताला चीनचे जेट फायटर जे-३६ ला टक्कर देण्यासाठी दिला आहे. भारताने रशियाकडे सुखोईची लेटेस्ट पाचव्या पिढीच्या विमानासाठी विचारणा केली होती. परंतू देखभालीसह तंत्रज्ञान स्ट्रान्सफर करण्यास रशिया तयार नसल्याने हा प्रस्ताव बारळगला आहे.
६ व्या पिढीचे लढाऊ जेट विमान विकसित करण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नात सामील होण्यासाठी जपानने भारताला आमंत्रण दिले आहे. या पावलामुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशातील लष्करी गतिशीलता पुन्हा एकदा सक्रीय होणार असून चीनच्या संभाव्य वाढत्या कुरापतींना शह देण्यासाठीचे हे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांत भारत सामील होतो की नाही यावर अद्यापही भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
भारताकडे पाचव्या पिढीचेही फायटर जेट सध्या नाही. सध्या भारताकडे फ्रान्सने दिलेली राफेल विमाने आहेत. राफेल हे चौथ्या पिढीचे विमान आहे. परंतू रडारवर जराही न दिसणा-या पाचव्या पिढीच्या फायटर विमानांची भारतीय वायु सेनेला तातडीने गरज आहे.
ग्लोबल कॉम्बॅट एअर प्रोग्रॅमअंतर्गत जपानने भारतात पुढे सहाव्या पिढीच्या विमानाला विकसित करण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नात सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जपान, युनायटेड किंगडम, भारत, इटली सारखे देश मिळून साल २०३५ पर्यंत सहाव्या पिढीचे फायटर जेट तयार करणार आहेत.
तेजस: सिंगल इंजिन विमान रखडले
भारताचे स्वदेशी लाईट कॉम्बॅट एअर क्राफ्ट हे तेजस हे सिंगल इंजिन विमान आहे. तेजसचा डबल इंजिनाचा प्रयोग देखील सुरू होणार आहे. तेजस फायटर विमानाला अमेरिकन जनरल इलेक्ट्रीक कंपनीने तंत्रज्ञान पुरविल्याने भारताचे तेजस विमानांचा ताफा वेगाने तयार झाला तर भारतीय वायू सेनेच्या जवानाच्या हवाई प्रशिक्षणाची सर्वात मोठी अडचण दूर होणार आहे. परंतू एचएएल मधून तेजस विमाने वेगाने तयार करण्यास विलंब झाला आहे.