मुंबई,दि.२१(प्रतिनिधी) मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पेटण्यास कारणीभूत ठरलेल्या जालन्यातील लाठीमाराचा ठपका असलेल्या जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती केल्याबद्दल मनोज जरांगे पाटील व मंत्री छगन भुजबळ या दोघांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मागणी लावून धरण्यात आली होती. तेव्हा सरकारने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. पण आता त्यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे बक्षीस तुषार दोशींना दिले आहे का ? लाठीमाराची न्यायालयीन चौकशी होणार आहे. राज्याच्या गृहमंर्त्यांनी लाठीमाराचा आदेश दिला नाही,तर हा आदेश देणारे कोण होते यांचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सहनशीलतेचं बक्षीस मिळाले असेल ! – भुजबळ
तुषार दोषी यांच्या नियुक्तीबाबत बोलताना, त्यांना सहनशीलतेचे बक्षीस म्हणून बढती मिळाली असेल, अशी उपरोधिक प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. जरांगेंना रुग्णालयात नेण्यासाठी पोलिस गेले तेव्हा दगडफेक झाली. त्यात ७० पोलिस कर्मचारी जखमी झाले. आणखी काही गोष्टी ज्या घडू नयेत त्या तिथे घडल्या. या सगळ्याबद्दल दोषी काहीच बोलले नाहीत. त्यांनी संयम ठेवला. सहन केलं. त्या सहनशीलतेचं बक्षीस म्हणून त्यांचं प्रमोशन झालं आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.