16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरलोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून जरांगे समर्थकांना शिवीगाळ आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती

लोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून जरांगे समर्थकांना शिवीगाळ आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती

जालना : आ. बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर हे देवठणा-उस्वद गावात प्रचारासाठी गेल्यानंतर काही जरांगे पाटील आंदोलन समर्थक असणा-या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी लोणीकर समर्थकांनी त्या युवकांना शिवीगाळ केली.

परतूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरक्षण प्रश्नावर प्रमुख नेते ताकही फुंकून पीत असताना आ. बबनराव लोणीकरांनी आष्टी (ता. परतूर) येथील मराठा समाजाच्या संख्येबाबत केलेल्या वक्तव्यानंतर समाजातून रोष व्यक्त केला जात आहे. त्यात लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर हे प्रचारादरम्यान मंगळवारी देवठाणा-उस्वद गावात ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती केली.

त्यावेळी संतप्त लोणीकर कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या उपस्थितीत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर लोणीकर समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत जरांगे पाटील समर्थकांना शिवीगाळ करत धमक्या दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR