26.9 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रजरांगेंची गाडी वाळू माफियांची

जरांगेंची गाडी वाळू माफियांची

मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करा लक्ष्मण हाके यांची मागणी

जालना : मनोज जरांगे जी गाडी वापरतात ती गाडी वाळू माफियांची असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ज्या वाळू माफियांचा पाठिंबा होता, त्यांचा सपोर्ट घेणे न घेणे हे कायदा सुव्यवस्था बघून घेईल. वाळू कोणी ओढावी, कायद्याचा भंग कोणी केला? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे

तसेच पुढे बोलताना लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की त्यांनी केवळ महसूलाच्याच नव्हे तर ओबीसी आरक्षणाच्या विरोधात जे काही षडयंत्र या महाराष्ट्रात रचले गेले, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य या लोकांकडून झाले, या लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि यांच्या मागे हे षडयंत्र रचणारा जर सुरेश धस यांच्या भाषेत बोलायचे झाले तर यांचा आका कोण होता, याचा शोध घेतला पाहिजे.

लक्ष्मण हाके म्हणाले, वाळू उपसा करणारे, महसूल बुडवणारे, गोदावरी नदीची चाळण करणारे यांना काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमंत्रित करतात का, तुम्ही अशी वाळू ओढा म्हणून? त्यामुळे मला असे म्हणायचे आहे की या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. मनोज जरांगे यांच्या मागे जर हे गुंड आणि फक्त वाळू माफियांपूर्त मर्यादित नाही. बीड शहर ज्यावेळी जाळले जात होते त्यावले आंतरवालीसराटीमध्ये गोळीबार करणारी माणसे यांना मोक्का पेक्षाही मोठा गुन्हा यांच्यामध्ये दाखल होतो. त्यामुळे फक्त तडीपारीची कारवाई करून चालणार नाही.

मकोका अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे
पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, माझे एवढेच म्हणणे आहे की ओबीसी आरक्षणात घुसखोरी करू नका. त्यांना जे काही १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे त्याला ओबीसीने कुठे विरोध केला आहे. ओबीसींचे एवढेच म्हणणे होते की तुम्ही ओबीसीमध्ये घुसखोरी करू नका आणि जर तुम्ही घुसखोरी केली तर ओबीसी आरक्षण संपेल, ही न्याय मागणी होती. तसेच ज्या ज्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे त्या लोकांवर याच लोकांनी हल्ले केले आहेत. ज्या लोकांवर तडीपारीची कारवाई झाली त्याच लोकांनी माझ्यावर पुण्यात येऊन हल्ला केला आहे. त्यामुळे त्यांना केवळ वाळूबद्दल कारवाई नव्हे तर मकोका अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी यावेळी लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR