16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाजय शहा आयसीसीचे सर्वांत तरुण अध्यक्ष

जय शहा आयसीसीचे सर्वांत तरुण अध्यक्ष

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून देणारे आयसीसीचे मावळते सचिव जय शाह यांनी आज आयसीसी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. भारतीय क्रिकेटनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जय शहा यांची आजपासून नवी इनिंग सुरु झाली. आयसीसीचे सर्वांत तरुण अध्यक्ष बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्यांनी पदभार स्वीकारला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ट्विट करत सर्वांचे आभार मानले. तसेच काही इतर बाबींवरही भाष्य केले.

जय शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले, आज आयसीसी चेअरमन म्हणून माझ्या भूमिकेची सुरुवात करताना मला खूप सन्मान वाटतो. क्रिकेट हा एक असा खेळ आहे जो जगभरातील लाखो लोकांना एकत्र आणतो. हा एक अफाट जबाबदारी आणि संधीचा क्षण आहे. आम्ही क्रिकेटच्या परिवर्तनाच्या टप्प्यात प्रवेश करत असताना, खेळाचा जागतिक स्तरावर ठसा वाढवण्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी नवीन मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मी आयसीसी संघ आणि सदस्य देशांसोबत जवळून काम करण्यासाठी वचनबद्ध आहे.

तळागाळातील उपक्रमांपासून ते बड्या स्पर्धांपर्यंत क्रिकेटला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे माझे व्हिजन आहे. जगभरातील चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्तता होईल असा माझा प्रयत्न राहिल. कसोटी क्रिकेट हे नेहमीच या खेळातील परमोच्च शिखर ठरले आहे. चाहत्यांमध्ये कसोटी क्रिकेटचे आकर्षण वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, त्यासोबतच कसोटी क्रिकेटची प्रतिमा जपण्यासाठीही आम्ही समर्पित भावनेने काम करू. आम्ही खेळाला नवीन क्षितिजावर नेत असताना महिला क्रिकेट हा आमच्या वाढीच्या धोरणाचा आधारस्तंभ असेल.

मी सर्व सभासद मंडळांचे त्यांच्या विश्वास आणि समर्थनाबद्दल आभारी आहे. आम्ही क्रिकेटला अभूतपूर्व उंचीवर नेण्याचा, पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि या महान खेळाद्वारे सा-यांना एकोप्याच्या भावनेने एकत्र आणण्याचा प्रयत्न करू असेही जय शाह यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR