27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रव्यापा-यांना तारा नि शेतक-यांना मारा, असा भाजप सरकारचा नारा

व्यापा-यांना तारा नि शेतक-यांना मारा, असा भाजप सरकारचा नारा

कांदा निर्यातबंदीवरून जयंत पाटलांचा हल्लाबोल

मुंबई :
गेल्या दोन दिवसांपासून सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली. अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मात्र, अद्यापही कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही. या केवळ अफवाच आहेत. सरकारने याबाबत स्पष्टीकरण देखील दिले आहे. यावरून जयंत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. व्यापा-यांना तारा आणि शेतक-यांना मारा असा या सरकारचा नारा असल्याची जहरी टीका जयंत पाटलांनी केली आहे.

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात घसरण होत आहे. अशातच कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे शेतक-यांना आर्थिक फटका बसतो आहे. दरम्यान, कांदा निर्यातबंदीच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

कांदा निर्यातबंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की कांदा निर्यातबंदी उठवलीच गेली नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. व्यापा-यांना तारा आणि शेतक-यांना मारा असा या सरकारचा नारा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यात चालू रबी हंगामात चार लाख ३२ हजार ७९८ हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे. त्यातून हंगामअखेर सुमारे ८६ लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे.

कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न
दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नसल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR