सोलापूर : यंदा २३डिसेंबर रोजी वैकुंठ एकादशी आहे यादिवशी तिरुमला येथे तब्बल ५लाख भाविकांसाठी दर्शनाची सोय करण्यात आली आहे. दरम्यान ज्या भक्तांना याठिकाणी जाता येत नाही अशा भक्तांसाठी सोलापूरातील दाजी पेठ व्यंकटेश्वर मंदिराच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदीराच्या बाहेर आणि मंदिर परिसरात बॅरिकेड्स लावून तीन रांगेत भाविकांना दर्शनासाठी सोय करण्यात आली आहे.त्याशिवाय मंदिरात शनिवारी होणाऱ्या वैकुंठ एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात सेवेकरी फुलांचा हार,दक्षणा पेटी,व इतर कामाची जय्यत तयारी मंदिर व्यवस्थापनाकडून होताना दिसतोय.
भूतलावरील तिरुपती, तिरूमला येथे भगवान बालाजी, पद्मावती यांचं वास्तवय आहे. भगवान बालाजी हे तिरुमला येथे तर पद्मशाली समाजाच्या कन्या पद्मावती यांचं तिरुपती तिरुचेन्नूर येथे वास्तव्य आहे. भगवान बालाजी हे स्वयंम विष्णूचे अवतार आहेत. भगवान बालाजी व पद्मावती यांचं मनानं प्रार्थना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. या बालाजीच्या दर्शनासाठी दररोज मंदिरात भाविकांची गर्दी असतेच विशेष म्हणजे वैकुंठ एकादशीच्या दिवशी भगवान बालाजीचं दर्शन घेतल्यानं इच्छीत मनोकामना पूर्ण होतात अशी अख्यायिका आहे.
मंदिराच्या प्रांगणात हार सजावट करण्यात सेवेकरी दंग आहेत. मंदिरात व मंदिराबाहेरील तसेच उद्या होणाऱ्या कार्यक्रमाचं नियोजनासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष रायलिंग आडम, विश्वस्त सदस्य राजू जक्कन, व्यंकटेश चिलका यांच्यासह अन्य विश्वस्त परिश्रम घेत आहेत