परभणी : महामहोपाध्याय सुरमणी डॉ. कमलाकरराव परळीकर यांना शुक्रवारी रात्री पूर्णवाद संगीत संमेलनाच्या उद्घाटनीय सोहळ्यात ख्यातनाम सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांच्याहस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
येथील अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात ग्रंथराज पुर्णवाद अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या ३ दिवसीय संगीत संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांच्या हस्ते डॉ. परळीकर यांचा शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आ. डॉ. राहुल पाटील, संगीत संमेलनाचे अध्यक्ष एकनाथ उर्फ अनिल मोरे, जीवनकला मंडळाचे अध्यक्ष व्यंकटेश कुरूंदकर, ओम पुर्णवादी संगीत अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संगीता पारनेरकर विराजमान होत्या. यावेळी डॉ. परळीकर यांनी आपण हा सन्मान सद्गुरु चरणी अर्पण करीत असल्याची भावना व्यक्त केली. आजच्या या सोहळ्याप्रसंगी प.पू.विष्णूमहाराज यांची उपस्थिती होती.