22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयझारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

रांची : झारखंडचे मु्ख्यमंत्री चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. झारखंड विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीमध्ये सोरेन सरकार पास झाले. चंपई सोरेन यांच्या समर्थनार्थ ४७ मते पडली, तर विरोधात २९ मते गेली. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळा, मनी लॉड्रिंगप्रकरणात ईडीने ३१ जानेवारीला अटक केली, त्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी बहुमत सिद्ध केले आहे.

या बहुमत चाचणीला हेमंत सोरेन देखील उपस्थित होते, यावेळी त्यांनी भावनिक भाषण केले. झारखंड मुक्ती मोर्चा नेतृत्त्वातील ४० आमदार थेट हैदराबादमध्ये गेले होते. त्यानंतर काल रात्री ते रांचीला परतले.

बहुमत सिद्ध करण्यासाठी दिला होता दहा दिवसांचा वेळ
झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे हेमंत सोरेन यांना अटक केली, त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (२ फेब्रुवारी) चंपई सोरेन यांना पद आणि गोपनियेतेची शपथ दिली आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवसांचा वेळ दिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR