22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयझारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन फरार?

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन फरार?

 भाजपच्या दाव्याने खळबळ

नवी दिल्ली : ईडीच्या रडारवर असलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा गेल्या २४ तासांहून अधिक काळ ठावठिकाणा नाही. ईडीकडेही त्यांच्या ठिकाण्याबाबत कोणतीही माहिती नाही असं समजतंय. हेमंत सोरेन यांचं चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावर उभं आहे. त्यांच्या स्टाफचा फोनही बंद आहे. त्यांची बीएमडब्ल्यू कार ईडीने काल जप्त केली

दरम्यान, ३१ जानेवारीला सोरेन रांचीतल्या आपल्या निवासस्थानी चौकशीसाठी उपलब्ध असतील असं त्यांच्या कार्यालयाने ईमेलद्वारे ईडीला कळवलंय. राजकीय हेतूंनी ही चौकशी प्रेरित असून ईडीमार्फत त्यांचं सरकार अस्थिर केले जात आहे, असा आरोप या ईमेलमध्ये करण्यात आला आहे.

रांचीमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या 4.55 एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीचा पर्दाफाश ईडीनं केला आहे. या प्रकरणी ईडीनं रांचीच्या बडागाईन झोनचे महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना अटक केली होती.

प्रदीप बागची, विष्णू कुमार अग्रवाल, भानू प्रताप प्रसाद आणि इतरांविरुद्ध झारखंड पोलीस आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीनं मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवून तीन जमीन घोटाळ्यांचा तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना ईडीनं आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली. या आरोपींनी सरकारी अधिका-यांच्या संगनमतानं भूमाफियांच्या नावे फसवणूक करून भूखंड हस्तांतरित केल्याचं तपासात उघड झालंय.

अटक करण्यात आलेल्या १४ आरोपींमध्ये प्रदीप बागची, अफसर अली, सद्दाम हुसेन, इम्तियाज अहमद, तल्हा खान, फैयाज खान, भानू प्रताप प्रसाद, छवी रंजन, आयएएस (माजी डीसी रांची) दिलीप कुमार घोष, अमित कुमार अग्रवाल, विष्णू कुमार अग्रवाल यांचा समावेश आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेनं आतापर्यंत २३६ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR