24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयझारखंडच्या मंत्र्यांचा मुलगा बनला कोर्टाचा शिपाई

झारखंडच्या मंत्र्यांचा मुलगा बनला कोर्टाचा शिपाई

रांची : झारखंड सरकारचे लेबर एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट मंत्री सत्यानंद भोक्ता यांचा मुलगा जिल्हा न्यायालयात शिपाई बनला आहे. मुकेश कुमार भोक्ता यांची जिल्हा न्यायालयात शिपाई पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांची या पदासाठी त्यांच्या गृहजिल्हा चतरा दिवाणी न्यायालयात निवड झाली आहे. चतरा दिवाणी न्यायालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी जागा रिक्त होती. त्याचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून त्यात एकूण १९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये मंत्री सत्यानंद भोक्ता यांचा मुलगा मुकेश कुमार भोक्ता यांचे नाव १३ व्या क्रमांकावर आहे. त्यांची एसटी कोट्यातून निवड झाली आहे. मंत्र्यांच्या मुलाने चतुर्थ श्रेणीच्या पदाची नोकरी स्वीकारल्याच्या सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. सत्यानंद भोक्ता चतरा विधानसभा मतदारसंघातून आरजेडीचे आमदार आहेत. २०१९ मध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात आले. भोक्ता हे आतापर्यंत तीन वेळा आमदार झाले असून तिसऱ्यांदा मंत्रीही झाले आहेत. आरजेडीपूर्वी ते भाजप आणि झारखंड विकास मोर्चामध्ये होते.

अशीच एका घटना राजस्थानमध्ये २०१७ साली घडली होती. तेंव्हा राजस्थानमध्ये भाजप सत्तेत होती. भाजपच्या एका आमदारावर आपल्या मुलाला सरकारी नोकरी लावल्याचा आरोप होता. जयपूरजवळील जामवरमगढ येथील भाजप आमदार जगदीश मीणा यांचा मुलगा रामकृष्ण मीणा यांची राजस्थान विधानसभा सचिवालयात शिपाई म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुलाखतीतून शिपाई झालेला आमदार मुलगा रामकृष्ण दहावी पास होता. निकालाची यादी जाहीर होताच हे प्रकरण चर्चेचा विषय बनले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR