36.3 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोहिनी नाईकांच्या उमेदवारीला जिरवळांचे पाठबळ

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोहिनी नाईकांच्या उमेदवारीला जिरवळांचे पाठबळ

मुंबई : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपला दावा केला असतानाच, आता या जागेसाठी महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच होतानाचे चित्र आहे.

अशातच आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मोहिनी नाईक यांच्या उमेदवारीबाबत भाष्य करताना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सोबतच त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यास आपण संपूर्ण ताकदीने त्यांना मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. जिरवळ हे आज यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या सगळ्यात आता नेमका कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, हे अंतिम यादी जाहीर झल्यावरच त्याबाबतचा शिक्कामोर्तब होणार आहे. अशातच आता महायुतीकडून राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांची यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी जिरवळ यांनी देखील त्यांच्या उमेदवारी पाठबळ दिले आहे.

त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, आज सकाळपासून मी या मतदार संघाच्या दौ-यावर आहे. या दौ-यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी अशी मागणी केली आहे की, आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्यात यावी. त्यासाठी आम्ही सर्व मिळून काम करू. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. परंतु मोहिनी नाईक यांना जर का उमेदवारी देण्यात आली तर मी स्वत: वैयक्तिकरित्या त्यांना मदत करण्याचे पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे देखील जिरवळ म्हणाले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR