38.8 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाफ्रेंच ओपनमध्ये सात्विक-चिरागने पटकावले अजिंक्यपद

फ्रेंच ओपनमध्ये सात्विक-चिरागने पटकावले अजिंक्यपद

पॅरीस : भारताची अनुभवी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी रविवारी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावताना संस्मरणीय कामगिरी केली. सात्विक-चिराग जोडीने ली हुए-यांग सुआन या चीन तैपईच्या जोडीवर सरळ दोन सेटमध्ये (२१-११, २१-१७) विजय मिळवला.

भारताच्या या जोडीला मागील ३ स्पर्धांमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, पण यंदा त्यांनी अंतिम फेरीचा अडथळा लिलया ओलांडला. फ्रेंच ओपन स्पर्धा त्यांनी दुस-यांदा जिंकली हे विशेष. सात्विक-चिराग व ली-सुआन या जोडीमध्ये पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ४-४ अशी बरोबरी झाली. त्यानंतर मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या चुकांचा फायदा घेत भारतीय जोडीने सलग ५ गुण मिळवत ९-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारतीयांच्या झंझावातासमोर चीनच्या खेळाडूंचा निभाव लागला नाही. १५-८ अशी आघाडी मिळवताना भारतीयांनी दमदार कामगिरी केली. पहिला गेम २१-११ असा अवघ्या १५ मिनिटांत त्यांनी जिंकला.

चीनच्या खेळाडूंकडून भारतीय जोडीला दुस-या गेममध्ये कडवी झुंज देण्यात आली. सुरुवातीला ५-५ अशा बरोबरीनंतर चीनच्या खेळाडूंनी १३-११ अशी आघाडी मिळवत भारतीय जोडीवर दबाव टाकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करीत झोकात पुनरागमन केले. भारतीय जोडीने १९-१५ अशी आघाडी घेतली. याप्रसंगी मागील १० पैकी ८ गुण भारतीय जोडीने मिळवले हे विशेष. अखेर २१-१७ असा दुसरा गेम जिंकून सात्विक-चिराग जोडीने तीन उपविजेतेपदानंतर अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR