रेणापूर : प्रतिनिधी
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. जनसामान्यांचा सर्वाधिक विश्वास हा पत्रकारांवरती असतो कारण सत्य हेच पत्रकाराचे परमकर्तव्य असते. सध्याच्या धावपळीच्या युगात कोणीच कोणचे नाही, अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे. असे असले तरी आजही पत्रकारांकडे खुप आशेने पाहिले जाते. त्यामुळे पत्रकारांनी समाजाच्या अपेक्षांची पुर्तता करावी, असे आवाहन लातूर तालुक्यातील गातेगाव अध्यात्म आश्रमाचे विद्यानंद सागर महाराज यांनी केले.
रेणापूर येथून चालविल्या जााणा-या राजमंत्र न्यूज या यु-ट्यूब चॅनलचे मु्ख्य संपादक सुधाकर फु ले यांनी दर्पण दिनानिमित्त ओयोजित पत्रकार पुरस्कार सोहळा व दिनदर्शिका प्रकाशन समारंभात बोलत होते. रेणापूर येथील रेणुकामाता मंदीरातील सभागृहात दि. ९ जानेवारी रोजी सकाळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषिकेश कराड होते. यावेळी दशरथ सरवदे, बालाजी कदम, इंदुताई इगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर, सुरेश पाटील नेत्रगावकर, दत्तात्रय कुलकर्णी यांना जीवन गौरव तर चंद्रकांत कातळे, रफिक शिकलकर, अहिल्या कसपटे यांना दर्पण पुरस्कार विद्यानंद सागर महाराज यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर म्हणाले, सद्य:स्थिती तत्वनिष्ठा ठेऊन पत्रकारिता करणा-यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांनी आपल्या कर्तव्यापासून किंचीतही बाजूला जाता कामा नये. पत्रकारीतेतील बदलते आयाम आणि त्या माध्यमातून विस्तारत चाललेली पत्रकारिता पत्रकारांसमोरच अनेक आव्हाने निर्माण करणारी ठरत आहे. त्याला सामोरे जाताना पत्रकारांनी आपले कौशल्य पणाला लावले पाहिजे. ऋषीकेश कराड म्हणाले, प्रिंटमिडीयासारखा आनंद डिजिटल मिडीयामध्ये नाही. टीआरपीच्या मागे पळण्याची स्पर्धा प्रचंड आहे. त्या गोंधळात सकारात्मकतेकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून असून पत्रकारांनीच समाजाची सकारात्मक करुन दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक सुधाकर फु ले यांनी केले. पाहूण्यांचे स्वागत सुधाकर फु ले, वाल्मिक केंद्रे, ईश्वर बद्दर, आचार्य यांनी केले. कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.