17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रबंद दाराआड ‘कानापुसी’

बंद दाराआड ‘कानापुसी’

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचा उद्रेक होत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उमेदवारी नाकारण्यात आलेले जळगावमधील खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. तर काल माढ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या धैर्यशिल मोहिते पाटील यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपाची साथ सोडली होती. त्यानंतर आता भाजपाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपा समर्थक असलेले इचलकरंजीचे आपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे भाजपावर नाराज असून त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील ंिरगणात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR