26.2 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रकराडने माझ्या अंगाला गैरस्पर्श केला

कराडने माझ्या अंगाला गैरस्पर्श केला

मारहाण केल्याचा करुणा शर्मांचा गंभीर आरोप

मुंबई : पवनचक्की कंपनीला खंडणी मागीतल्या प्रकरणी वाल्मीक कराड याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही कराड याचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनीही गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्यासोबत वाद वाढल्यानंतर बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मीक कराड याने आपल्याला चुकीचा स्पर्श केल्याचा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी हा आरोप केला.

काल कोर्टाने करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर माध्यमांसोबत बोलत असताना करुणा शर्मा यांनी वाल्मीक कराडवर गंभीर आरोप केला. करुणा शर्मा म्हणाल्या,बीड जिल्हाधिका-यांच्या दालनात धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मीक कराड याने माझ्यावर हात उगारला होता. तसेच वाल्मीक कराड याने माझ्या अंगाला गैरस्पर्श करत मारहाण केली, असा गंभीर आरोप शर्मा यांनी केला.

माझ्या पतीसमोर कराड याने माझ्यावर हात उगारला. मी यावेळीचा सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी मागणी केली होती. पण मला ते अजूनही मिळालेले नाही, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यावर कारवाई करा अशी मागणीही शर्मा यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR