21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयकर्नाटक सरकार हिजाब बंदीचा आदेश घेणार मागे

कर्नाटक सरकार हिजाब बंदीचा आदेश घेणार मागे

बंगळुरू : कर्नाटकातील तत्कालीन भाजप सरकारने २०२२ मध्ये हिजाबवर बंदी घातली होती. आता कर्नाटक सरकारने ही बंदी उठवण्याची घोषणा केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर कपडे, पोशाख, जात यांच्या आधारावर लोकांमध्ये आणि समाजामध्ये फूट पाडल्याचा आरोप केला. राज्य सरकार हिजाब बंदी मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. सिद्धरामय्या यांनी म्हटले की, मी हिजाब बंदी मागे घेण्यास सांगितले आहे.

याआधी म्हैसूर येथे एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, तुम्ही कसे कपडे घालता आणि काय खावे ही तुमची निवड आहे. राज्यातील लोक जे आवडतील ते घालण्यास आणि खाण्यास स्वतंत्र आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, राज्यात हिजाबवर प्रभावी बंदी नाही. यावर घातलेले निर्बंध लवकरच उठवले जातील, असे ते म्हणाले. एक महिला तिला हवे ते परिधान करू शकते. आता हिजाबवर बंदी नाही. मुस्लिम महिला हिजाब घालून कुठेही जाऊ शकतात. बंदीचे आदेश मागे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. तुम्ही काय घालता आणि काय खावे ही तुमची निवड आहे. मी तुला का थांबवू? असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR