24.4 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeराष्ट्रीयकरणी सेना अध्­यक्षांची हत्­या जमिनीच्­या वादातून

करणी सेना अध्­यक्षांची हत्­या जमिनीच्­या वादातून

जयपूर : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवार, ५ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्­यात आली, दरम्­यान, सुखदेव सिंह यांच्या हत्येतील दोन आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी, असा संशय राजस्­थान पोलिसांनी व्­यक्­त केला आहे.

मकराना नागौर येथील रोहित राठौर आणि हरियाणातील महेंद्रगडचा नितीन फौजी अशी संशयित आरोपींची नावे आहेत. नवीन शेखावत, रोहित राठोड आणि नितीन फौजी यांनी देणगी देण्याच्या बहाण्याने करणी सेनेच्या प्रमुखाची भेट घेतली होती. हत्येसाठी नवीनने तीन दिवसांपूर्वी मालवीय नगर येथील एजन्सीकडून प्रतिदिन ५ हजार रुपये भाड्याने एक एसयूव्ही कार घेतली. आरोपी गोगामेडी यांच्या निवासस्थानी कार सोडून गेले होते. कारमधून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. गँगस्टर रोहित गोदारा याने या हत्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर तशी पोस्टही त्याने शेअर केली.

रोहित गोदारा हा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित आहे. करणी सेनेचे अध्­यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी आणि रोहित गोदारा याचच्या जमिनीवरुन वाद होता, अशी माहिती प्राथमिक पोलिस तपासात समोर आली आहे. मात्र, पोलिस या प्रकरणाचा अन्य बाजूंनीही तपास करत आहेत. विजेंद्र सिंह या मालमत्ता खरेदी-विक्री करणा-या एजंटची गेल्या वर्षी हत्या झाली होती. या हत्­या प्रकरणातील आरोपी हे करणी सेने अध्­यक्ष सुखदेव सिंह यांचे निकटवर्ती होते. या हत्येचा बदला घेण्­यासाठी सुखदेव यांची हत्­या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्­यक्­त होत आहे.

राजस्थान बंदची दिली होती हाक
सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येच्­या निषेधार्थ राष्ट्रीय राजपूत करणी सेना आणि इतर समुदाय संघटनांनी राजस्थानमध्ये आज बंदची हाक दिली होती. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR