24.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeसोलापूरकच-याचे ढिगारे, घाणीचे साम्राज्य हटवून स्वच्छता ठेवा

कच-याचे ढिगारे, घाणीचे साम्राज्य हटवून स्वच्छता ठेवा

सोलापूर : सोलापूर शहर संपूर्ण देशभरात कागमार, गिरण्यांचे, वस्रोद्योगांचे व तसेच स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. संपूर्ण शहर अनेक वर्षांपासून पाणी टंचाई, वाहतूक समस्यांसारख्या प्रश्नांना तोंड देत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून शहरात ठीक ठिकाणी रस्त्यावरील वाहणारे पावसाचे पाणी तुंबून नागरिकांच्या घरात व व्यावसायिकांच्या दुकानात शिरून भरपूर नुकसान झालेचे निदर्शनास आले आहे.

ह्यामध्येच भर की काय म्हणून शहरभरात जागोजागी सार्वजनिक ठिकाणी मागील अनेक दिवसांपासून कचरा न उचल्याने कच-याचे ढीगच्या ढीग साचले आहेत. ह्या कच-याच्या ढिगा-यांमुळे चादरीसाठी प्रसिद्ध असणारे सोलापूर शहर ‘कचरापूर’ होते की नागरिकांना वाटत आहे. नुकतीच महापालिकेची शहरातील नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याच्या हिताकरिता नियोजनाची बैठक पार पडली असून असे शहरातील कच-यांच्या ढिगा-यांमुळे वाढती दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य वाढतच असून नागरिकांचे जीवन धोक्यात असून महापालिका याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

तरी नागरिकांच्या जीविताशी धोकादायक असणारे शहरातील ठीक ठिकाणी साचलेले कच-याचे ढिगारे, घाणीचे साम्राज्य हटवून लाखो नागरिक, बालकांचे जीव वाचवावेत अन्यथा संभाजी आरमार नागरिकांच्या हिताकरिता सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यास कसर ठेवणार नाही याची योग्य दखल घेऊन कारवाई करण्यासाठी निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, शहरप्रमुख सागर ढगे, उपशहरप्रमुख रेवणसिद्ध कोळी, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, प्रभाग प्रमुख सागर दासी, अक्षय सिद्राल आदीजण उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR