27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकाँग्रेसमुळेच केजरीवाल जेलमध्ये

काँग्रेसमुळेच केजरीवाल जेलमध्ये

कोझिकोड : दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनिषेधार्थ इंडिया आघाडीनं रामलीला मैदानात लोकशाही बचाओ महारॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीच्या दुस-याच दिवशी इंडिया आघाडीतील घटक पक्षाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसकडून अरविंद केजरीवालांवर आरोप करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसनेच दिलेल्या तक्रारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेले असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला. विशेष म्हणजे दिल्लीच्या महारॅलीत राहुल गांधी यांच्यासोबत सीपीआय(ट) चे महासचिव सीताराम येचुरीही सहभागी होते.

मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले की, वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी पुन्हा निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या सीपीआयचा उमेदवार मैदानात आहे. राहुल गांधी काँग्रेसचे मोठे नेते आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. पण वायनाडमध्ये ते कोणाविरोधात लढाई लढतायेत हे पाहा. त्याठिकाणी सीपीआयचे एनी राजाविरोधात राहुल गांधी उभे आहेत. काँग्रेस आणि सीपीआय इंडिया आघाडीचा भाग आहे. मात्र ते भाजपाशी लढण्याऐवजी सीपीआयच्या उमेदवाराला आव्हान देत आहेत असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, वायनाडमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवून भाजपाने खेळी खेळली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि बीडीजेएसने एकत्रित निवडणूक लढली होती. त्यावेळी तुषार वेल्लापल्ली त्यांचे उमेदवार तिस-या स्थानावर होते. त्यांना जवळपास ७८ हजार मते मिळाली होती जी ७.२५ टक्के होती. तर राहुल गांधींना ४ लाख ३१ हजाराहून अधिक मतदान झाले होते. मोठ्या मताधिक्यांनी त्यांनी ही जागा जिंकली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR