22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कथित मद्य घोटाळाप्रकरणात ईडीने कारवाई करून अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज राऊज अ‍ॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी ठोठावली आहे.

ईडीने न्यायालयीन कोठडी मागितल्यानंतर कोर्टाने हा आदेश दिला. त्यामुळे आता १५ एप्रिलपर्यंत ते तिहार जेलमध्ये असतील. कोर्टासमोर हजर करण्यासाठी त्यांना नेण्यात येत असताना, केजरीवाल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘पंतप्रधान मोदी जे करत आहेत ते योग्य नाही’ असे केजरीवाल म्हणाले.

२८ मार्च रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांच्या७ दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने त्यांना १ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने आज अरविंद केजरीवाल यांची कोठडी मागितली नाही आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची विनंती केली

केजरीवाल यांना १५दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी ईडीने केली, जी न्यायालयाने मान्य केली. केजरीवाल यांनी त्यांच्या डिजिटल डिव्हाइसचे पासवर्ड दिलेले नाहीत. तसेच त्यांचे वागणे असहकाराचे आहे. कोणत्याही प्रश्नाचे ते योग्य उत्तर देत नाहीयेत, फक्त उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, असे ईडीने नमूद केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR