22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रखडसे दाम्पत्यांना जामीन मंजूर

खडसे दाम्पत्यांना जामीन मंजूर

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी मोठा दिलासा जावई चौधरींनाही जामीन

मुंबई : पिंपरी-चिंचवडमधील कथित भोसरी एमआयडीसीतील भूखंड घोटाळाप्रकरणी खडसे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयाला कोर्टाने नियमित जामीन मंजूर केला आहे.

एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी या तिघांना नोव्हेंबर २०२३ मध्ये हायकोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता त्यांना नियमित स्वरुपाचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खडसे कुटुंबियांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २०१६ मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक भूखंड खरेदी केला होता.

बाजारभावापेक्षा अगदी कमी किमतीत हा भूखंड खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात खडसे यांच्यासह पत्नी आणि जावयावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासानंतर ११ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR