17.6 C
Latur
Monday, November 18, 2024
Homeमहाराष्ट्रमतदानापूर्वीच खडसे यांची राजकीय संन्यासाची घोषणा

मतदानापूर्वीच खडसे यांची राजकीय संन्यासाची घोषणा

जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राजकारणात चार दशकांपासून कार्यरत असलेले पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी सोशल मिडीयावर व्हिडीओच्या माध्यमातून सोमवारी राजकीय संन्यासाची घोषणा केली. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच यावेळी भावनिक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल, असे म्हणत त्यांनी मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचे आवाहन केले.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, मी नाथाभाऊ बोलत आहे. या निवडणुकीत रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. यापुढे मी निवडणूक लढवणार नाही. मी गेली अनेक वर्षे आपल्या सोबत आहे. गेली अनेक वर्षे आपण सर्वांनी मला सहकार्य केले आहे. कधी जात-धर्म न पाहता सर्वांना मदत केली. आपण मला जसे सहकार्य केले, तसे सहकार्य रोहिणी खडसे यांना करावे आणि निवडून आणावे, असे भावनिक आवाहन एकनाथ खडसे यांनी केले.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एकनाथ खडसे राज्यातील भाजपचा चेहरा होते. पक्षाला वाढवण्यात गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर खडसे यांचे मोलाचे योगदान होते. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दची सुरुवात कोथडी गावाचा सरपंच म्हणून केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. आमदार, विरोधी पक्षनेते, १२ खात्याचे मंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली. पक्षात त्यांनी अनेकांना मोठे केले. त्यांच्या शब्दाला दिल्लीपर्यंत किंमत होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR