28.5 C
Latur
Wednesday, October 9, 2024
Homeराष्ट्रीयखलिस्तानी दहशतवादी पुन्हा सक्रिय; शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचे प्रयत्न

खलिस्तानी दहशतवादी पुन्हा सक्रिय; शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचे प्रयत्न

चंदीगड : खलिस्तानी दहशतवाद्यांच्या मुद्यावरून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरु आहे. हा वाद शिगेला पोहचला असून भारताने खलिस्थानी दहशवाद्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात भारत कॅनडावर दवाब टाकत आहे. दरम्यान, फुटीरतावादी दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या पाकिस्तानच्या हालचालींचा सुरक्षा दलांनी पर्दाफाश केला आहे. तसेच पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवादी पुन्हा सक्रिय झाले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून भारतात ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे. दहशतवादी ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांचा वापर देशविरोधी कारवायांमध्ये करतात.

ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानातून पंजामधील तरनतारनमध्ये घुसलेले ड्रोन चार वेळा पाडण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे शस्त्रे आणि ड्रग्सची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत, पंजाब तरनतारनमध्ये बहुतेक वेळा असे ड्रोन पाडले गेले आहेत, जे दहशतवाद्यांच्या मदतीसाठी भारतात घुसले होते.

पाकिस्तानच्या या नव्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहेत. पंजाबमध्ये ही खेप मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या खलिस्थानी दहशवाद्यांचा आणि एजंटचा सुरक्षा यंत्रणा शोध घेत आहेत. पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडण्यासाठी या भागात ड्रोनविरोधी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून स्थानिक पोलिसांसोबत विशेष मोहीमही राबवण्यात आली आहे.

सुरक्षा यंत्रणांसाठी मोठ्या चिंतेचे कारण हे आहे की, गेल्या एका महिन्यात तरनतारनजवळ अमृतसरमध्ये असेच ड्रोन सापडले आहेत. सुरक्षा दलांच्या चिंतेचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे तरनतारन आणि अमृतसरमध्ये जप्त करण्यात आलेले ड्रोन चीनमध्ये बनलेले आहेत आणि ते कमी वजनाचे आहेत, ज्याद्वारे जास्तीत जास्त वजनाची खेप पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानची ही खेप ड्रग्ज आणि शस्त्रांची आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR