35.2 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeमहाराष्ट्रखोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीत मारहाण

खोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीत मारहाण

वकिलाच्या दाव्यानंतर पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा अनेक कारणामुळे चर्चेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी प्रकरण समोर आली आहेत. याच काळात सतीश भोसले उर्फ खोक्याचेही कारणामे समोर आले. त्यानंतर आता हा खोक्या तरुंगात आहे. पोलिसांच्या ताब्यात आहे. असे असतानाच आता या खोक्याला वन विभागाच्या कोठडीत असताना मारहाण झाल्याचे म्हटले जात आहे. या मारहाणीचे फोटो व्हायरल जाल्यानंतर आता खोक्याला पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाच्या कोठडीत खोक्या भोसले याला मारहाण झाल्याचा दावा केला जातोय. खोक्याच्या वकिलाने तसा दावा केला आहे. खोक्याला मारहाण झाल्यानंतर वळ उठल्याचे कथित फोटो व्हायरल झाले आहेत. या मारहाणीच्या दाव्यानंतर आता खोक्या भोसलेले पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळपासून खोक्या उर्फ सतीश भोसले याला वन विभागाने ताब्यात गेतले होते. ताब्यात घेतल्यानंतर त्याला मारहाण झाल्याचे त्याच्या वकिलाने म्हटले आहे. समोर आलेल्या फोटोंचा आधार घेत वकिलाने सतीश भोसले याला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. वकिलाची ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR