30.5 C
Latur
Sunday, March 23, 2025
Homeक्रीडाकेकेआरला 174 धावांवर रोखले

केकेआरला 174 धावांवर रोखले

कोलकाता : आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 175 धावांचं आव्हान ठेवलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 174 धावा केल्या. केकेआरसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

त्यामुळे केकेआरला 200 पार मजल मारण्याची संधी होती. मात्र इथून आरसीबीच्या फिरकी गोलंदाजांनी कमाल केली. आरसीबीने दणक्यात कमॅबक केलं. फिरकीपटूंनी केकेआरच्या फलंदाजांना झटपट आऊट करत मोठी धावसंख्या करणयापासून यशस्वीरित्या रोखलं. आता आरसीबीचे फलंदाज हे विजयी आव्हान पूर्ण करण्यात यशस्वी होतात का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. केकेआरने क्विंटन डी कॉक याच्या रुपात पहिली विकेट गमावली. डी कॉक 4 धावांवर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन रहाणे आणि सुनील या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 103 रन्सची पार्टनरशीप केली. रसीख सलाम याने ही जोडी फोडली. रसीखने सुनीलला 10 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर आऊट केलं. सुनीलने 26 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरसह 44 रन्स केल्या. सुनील आऊट झाल्यानंतर रहाणेही बाद झाला. रहाणे 11 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कॅच आऊट झाला. रहाणेने 31 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 56 धावांची अर्धशतकी खेळी.

त्यानंतर केकेआरची घसरगुंडी झाली.अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंह या दोघांशिवाय उर्वरित एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. अंगकृष याने 30 धावा केल्या. तर रिंकूने 12 धावांचं योगदान दिलं. तर उपकर्णधार वेंकटेश अय्यर याने 6 रन्स केल्या. आंद्रे रसेल याला 4 धावांवर रोखण्यात यश आलं. हर्षित राणा याने 5 धावांची भर घातली. तर रमनदीप सिंह (5) आणि स्पेन्सर जॉन्सन (1) ही जोडी नाबाद परतली. आरसीबीसाठी कृणाल पंड्या याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर यश दयाल, रसीख सलाम आणि सुयश शर्मा या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR