22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रशिरूरमधून कोल्हेच लोकसभेचे उमेदवार

शिरूरमधून कोल्हेच लोकसभेचे उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पहिला उमेदवार ठरला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

पिंपरी : काही लोक गेले असले तरी नाउमेद होऊ नका, मतदार जागेवरच आहे. शरद पवार यांच्याबद्दल समाजात प्रचंड सहानभूती आहे. पवार यांचे नाव, तपश्चर्या असून त्याचा निवडणुकीत फायदा होईल असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातून खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भोसरी विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पाटील बोलत होते. शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्षा ज्योती ंिनबाळकर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, काशिनाथ नखाते, देवेंद्र तायडे, प्रवक्ते माधव पाटील यावेळी उपस्थित होते.पाटील म्हणाले की, आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी बूथ कमिट्या सक्षम करा. बूथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपणच आपली फसवणूक करून घेतो, असा त्याचा अर्थ होतो. गर्दी जमणे, माणसे गोळा होणे, हे महत्वाचे असून निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहचणारे सैन्य नसेल तर पक्षाच्या प्रचाराला तळागळापर्यंत पोहचविण्याची क्षमता कमी होते. शिरूर लोकसभा मतदार संघातून डॉ. कोल्हे उभे राहणार आहेत. शरद पवार यांच्याबद्दल समाजात प्रचंड सहानभूती आहे. त्याचा कोल्हे यांना फायदा होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR