31.6 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeक्रीडा‘पंजाब किंग्ज’समोर ‘कोलकाता’ ढेर

‘पंजाब किंग्ज’समोर ‘कोलकाता’ ढेर

आयपीएल इतिहासातील सर्वांत कमी धावसंख्येचा केला बचाव १६ धावांनी कोलकात्याचा पराभव

मुलानपूर : पंजाब किंग्जने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला. मंगळवारी मुल्लानपूरमध्ये संघाने कोलकाता नाईट रायडर्सला ११२ धावांचे लक्ष्य गाठू दिले नाही. मंगळवारी महाराजा यादविंद्र सिंह स्टेडियमवर केकेआरचा संघ ९५ धावांवर ऑलआउट झाला.

पंजाबकडून युजवेंद्र चहलने ४ विकेट्स घेत सामना पार बदलून टाकला. मार्को यान्सनने ३ विकेट्स घेतल्या. प्रभसिमरन सिंगने ३० आणि प्रियांश आर्यने २२ धावा केल्या. कोलकाताकडून हर्षित राणाने ३ बळी घेतले. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. आयपीएल २०२५ स्पर्धेच्या ३१ व्या सामन्यात पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला धोबीपछाड दिला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. मात्र असे होऊनही सर्व काही चुकत गेले. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

इतकंच काय तर पंजाब किंग्स संघाला २० षटकंही पूर्ण खेळता आली नाही. पंजाबचा संघ १५.३ षटकांत १११ धावांवर ऑलआऊट झाला. कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी ११२ धावांचे आव्हान होते. हे आव्हान कोलकाता सहज गाठेल असे वाटत होते. पण पंजाबने तसे होऊ दिले नाही. पॉवर प्लेमध्ये दोन मोठे धक्के दिले. पंजाब किंग्सने कमबॅकसाठी सर्वस्वी पणाला लावले होते. पण कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांना धाव सावरला आणि सावध खेळी केली. पण ही जोडी फुटली आणि सर्व काही धडाधड कोसळले.

पंजाबचा विक्रम
पंजाबने १११ धावांचा बचाव केला, संघाने आयपीएलमधील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला. त्यांच्या आधी, २००९ मध्ये, चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जविरुद्ध ११६ धावांचा बचाव केला होता. तेव्हा पंजाबला फक्त ९२ धावा करता आल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR