नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘विकास भारत संकल्प यात्रे’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मोदी गॅरंटी’ वाहनाबाबत देशाच्या प्रत्येक गावात उत्साह दिसत आहे. देशभरातील खेड्यापाड्यातील कोट्यवधी कुटुंबांना आमच्या सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ नक्कीच मिळाला आहे. जेंव्हा त्यांना हा लाभ मिळतो, तेंव्हा आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्यासाठी एक नवी ताकद मिळते. पूर्वी जी भीक मागण्याची मानसिकता होती ती आता गेली आहे. सरकारने लाभार्थी ओळखले आणि मग त्यांना लाभ देण्यासाठी पावले उचलली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, विकास भारत संकल्प यात्रा अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचे एक मोठे माध्यम बनले आहे, ज्यांना आजपर्यंत कधीच सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला नाही. इतक्या कमी कालावधीत १.२५ कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहचणे ही मोठी गोष्ट आहे. लोकांनी मोदींच्या हमीपत्र वाहनापर्यंत पोहोचून त्याचे स्वागत केले आहे, त्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मोदींचे हमीपत्र वाहन प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे यासाठी सरकारचा सतत प्रयत्न असतो.