नवी दिल्ली : टी-२० मालिकेत अफगाणिस्तानचा क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळणार आहे. आता सध्या भारतीय अ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध सराव सामने खेळले जात आहे.
या सामन्यामध्ये टीम इंडियाचा यष्टीरक्षक केएस भरतने इंग्लंड लायन्सविरुद्ध धमाकेदार शतक झळकावले. या खेळीमुळे अडचणीत सापडलेल्या भारत अ संघाला सामना अनिर्णित ठेवण्यात यश आले. इंग्लंडविरुद्ध त्याने झळकावलेले शतक भारताने एका खास पद्धतीने साजरे केले आणि ते भगवान श्री रामाला समर्पित केले. टीम इंडिया वर्षातील पहिल्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धचा सामना खेळण्यापूर्वी तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळली आहे. नवीन वर्षातील ही भारताची पहिली कसोटी मालिका असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना गेल्या वर्षी झाला होता तर दुसरा सामना नववर्षाला झाला होता. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय यष्टीरक्षक केएस भरतने इंग्लंड लायन्सविरुद्ध कठीण शतक झळकावले आणि सामना अनिर्णित राहिला. इंग्लंड लायन्स विरुद्धच्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय यष्टीरक्षक केएल भरतने ११६ धावांची खेळी केली. ४९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दुस-या डावात ५ गड्यांच्या मोबदल्यात ४२६ धावा केल्या, त्याआधी पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. भारताने तिस-या दिवशी ४ गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या आणि पराभवाचा धोका होता. पण भरतने मानव सुथारच्या साथीने संघाला पराभवापासून वाचवले.
केएस भरतने १६५ चेंडूंचा सामना करत ११६ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने एकूण १५ चौकार मारले. भारतीय यष्टीरक्षक बॅटरने मानवसोबत ५ व्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. केएस भरतने शतक पूर्ण केल्यानंतर मैदानावर धनुष्यबाण सोडत सेलिब्रेशन साजरे केले. त्यांचे हे शतक श्रीरामाला समर्पित होते. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे.