परभणी/प्रतिनिधी
गुजरात राज्यातील सुरत महानगरात आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्टिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावणा-या एनव्हीएस मराठवाडा हायस्कूलचा विद्यार्थी आदित्य नितीन खळीकर यांचा मराठवाडा हायस्कूल प्रशालेच्या वतीने दि. ३ जानेवारी रोजी सत्कार करण्यात आला.
मराठवाडा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजयराव जोशी तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपाध्यक्ष अनिल अष्टुरकर, कार्यकारणी सदस्य व्यंकटेश तोरंबेकर, सहसचिव तथा प्राचार्य अनंत पांडे, उपमुख्याध्यापक बाळकृष्ण कापरे, पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील, शिवाजी आरळकर, सुनील रामपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नूतन विद्या समितीचे अध्यक्ष जोशी यांनी पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक पट्टू आदित्य खळीकरला शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्यासाठी आदित्यचे आजोबा निवृत्त पोलिस निरीक्षक श्रीकांतराव खळीकर, आजी सेवानिवृत्त शिक्षिका सौ. जयंती खळीकर, भाऊ अजिंक्य खळीकर उपस्थित होते. सत्कार मूर्ती आदित्य खळीकर याने याप्रसंगी शाळेचे सहकार्य मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक प्राचार्य अनंत पांडे, सूत्रसंचलन शिवप्रसाद कोरे तर आभार बाळकृष्ण कापरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विश्वास दिवाळकर, अभिजीत कुलकर्णी, डॉ. प्रा. सुनील तुरुकमाने, श्रीपाद कुलकर्णी, विनोद लोलगे, गिरीश देशपांडे, राजेश उफाडे, अविनाश जाधव, गोपाळ रोडे, नितीन बिरादार, वसंत पुरी, प्रशांत डाफणे, अविनाश कंधारकर आदींनी परिश्रम घेतले.