23.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeराष्ट्रीयव्हीआयपी, हलगर्जीपणामुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी!

व्हीआयपी, हलगर्जीपणामुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी!

प्रयागराज : विशेष प्रतिनिधी
कुंभमेळा म्हणजे श्रद्धेचा महासागर. मात्र, पुरेसे व्यवस्थापन न केल्यामुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तो अनेकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला.

हरिद्वारमध्ये १४ एप्रिल १९८६ रोजी झालेल्या कुंभ पर्वस्रानातही असाच हृदयद्रावक प्रकार घडला होता. त्या दिवशी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीरबहादूर सिंह, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन डझनांहून अधिक खासदार स्रानासाठी आले. त्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘हर की पौडी’ येथे सामान्य भाविकांना रोखण्यात आले. त्यामुळे गर्दी प्रचंड झाली आणि भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेच्या चौकशीसाठी वासुदेव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मुख्य स्रान पर्वाच्या दिवशी व्हीआयपींना प्रवेश न देण्याची स्पष्ट शिफारस केली होती. मात्र, प्रशासनाने ती शिफारस धुडकावली आणि त्याच हलगर्जीपणाचा फटका या महाकुंभात पुन्हा बसला आहे.

माजी पोलिस महासंचालक विभूती नारायण राय म्हणाले की, १२ ते १५ किलोमीटर चालत लाखो भाविक संगमावर पोहोचले होते. तिथे आधीच प्रचंड गर्दी होती. प्रशासनाने त्यांना दुस-या घाटांकडे वळवायला हवे होते. पण तसे झाले नाही. सरकारी हलगर्जीपणा, व्हीआयपी संस्कृतीला दिले जाणारे अवास्तव प्राधान्य यामुळेच सामान्य भाविकांना आपला जीव गमवावा लागला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR