बार्शी : येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर तालुक्यातील पांगरी गावामध्ये चालू आहे. यावेळी रा.से.यो.च्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून गावांमधील शिवराम मठ, गावातील मुख्य बाजारपेठ, पांगरी ग्रामीण रुग्णालय, पांगरी पोलीस स्टेशन, गावातील जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, गावातील तुंबलेल्या गटारीची स्वच्छता सर्व कामे स्वयंसेवकांनी श्रमदानातून केली.
सोलापूरचे उपविभागीय अधिकारी सदाशीव पडदुणे यांनी शिबिराला भेट देऊन शिबिरार्थी स्वयंसेवकांना मार्गदर्शनात राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची असून स्वयंसेवकांनी ग्रामीण भागातील माणसाचे जीवन समजून घेत, खेड्यापाड्यातील गोरगरीबांसाठी आपण काम केले पाहिजे असे सांगितले. स्वयंसेवकांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीविषयीच्या समस्या, अडचणी जाणून घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विशाल कदम यांनी स्पर्धा परीक्षातून युवकांचे व्यक्तिमत्वाविषयी शिबिरार्थी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी . शहाजी धस यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी पांगरीच्या सरपंच सौ. रेणुका मोरे, उपसरपंच गणेश गोडसे, ॶॅड. अनिल पाटील, डॉ. विलास लाडे, रमेश काकडे, विष्णू पवार, गावातील नागरिक उपस्थित होते. हे शिबिर . प्राचार्य डॉ.मनोज गादेकर यांच्या मार्गदर्शनात चालू आहे. संचालन शिबिरार्थी स्वयंसेविका आरती घोंगाने, पाहुण्यांचा परिचय लावण्या शिंदे, पाहुण्यांचे आभर राखी गाडेकर यांनी केले. जि. प. शाळा मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय गोडसे, सौ. सुनिता मुळे यांच्यासह के. टी. व्हनहुवे, डॉ. स्नेहलता मुळे, डॉ, जयराम काशीद,प्रा. विजयसिंह पाटील, डॉ. नवनाथ दणाणे, डॉ .नमिता डोईफोडे डॉ. कविता गायसमुद्रे प्रा. चंद्रकांत यादव यांचे सहकार्य लाभले.