20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeहिंगोलीमराठा आरक्षण संवाद रॅलीसाठी लाखों समाजबांधव

मराठा आरक्षण संवाद रॅलीसाठी लाखों समाजबांधव

हिंगोली : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व सगेसोयरे कायदा अंमलात आणावा, यासाठी हिंगोलीतून संवाद रॅलीचा प्रारंभ मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत शनिवार दि. ६ जुलै रोजी झाला. यावेळी रॅलीसाठी लाखों मराठा समाजबांधव हिंगोली ते दाखल झाले आहेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आली. शासन मात्र चालढकल करीत असल्याने ६ ते १३ जुलै यादरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मराठा आरक्षण संवाद रॅली शांततेच्या मार्गाने काढण्याचा निर्धार मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी केला आहे. यानिमित्त हिंगोलीत आज मराठा आरक्षण संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मनोज जरांगे यांचे बळसोंड भागातील शिवनेरी चौकात जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले.

५१ उखळी तोफांची सलामी
मनोज जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले. यावेळी ५१ उखळी तोफांची सलामी दिली. त्यानंतर याच ठिकाणाहून रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली शिस्तबद्ध पद्धतीने काढण्याची पूर्वसूचना देण्यात आली होती.जवळपास साडेतीन लाख समाजबांधव या रॅलीला उपस्थित असल्याचा अंदाज आहे.

चोख पोलिस बंदोबस्त
रॅलीच्या निमित्ताने जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ५५ पोलिस अधिकारी, जिल्हा पोलिस दलातील ४५० कर्मचारी तसेच लातूरहून १५० पोलिस बंदोबस्तासाठी मागविण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR