मुंबई : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल आई-बाबा बनले आहेत. अथिया शेट्टीने बाळाला जन्म दिला आहे. अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुलच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुलला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली.
अथिया शेट्टी आणि केएल राहुलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलगी झाल्याची गोड घोषणा केली आहे. त्या दोघांनीही एक फोटो शेअर केला आहे. आम्हाला २४ मार्च २०२५ रोजी कन्यारत्नाचा लाभ झाला आहे, अथिया आणि राहुल असे त्यांनी म्हटले आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुलने ही पोस्ट करताच अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या या पोस्टवर परिणीती चोप्रा, रिद्धिमा कपूर साहनी, मसाबा गुप्ता, शाहीन भट्ट, अर्जुन कपूर, कियारा अडवाणी, कृती सॅनन, कृष्णा श्रॉफ, शनाया कपूर यांनी लाईक केले आहेत.