22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातून अयोध्येसाठी धावणार लालपरी

पुण्यातून अयोध्येसाठी धावणार लालपरी

एप्रिलमध्ये धावणार पहिली बस

पुणे : आता पुण्याहून अयोध्येसाठी एसटी बससेवा सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना सहज अयोध्या दर्शनाची संधी उपलब्ध होणार आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी राज्य परिवहन विभाग पुण्यातून बस सोडणार आहे. एप्रिलमध्ये पहिली गाडी पुण्यातून अयोध्येला रवाना होणार आहे.
अयोध्येत रामलल्लाचे भव्य असे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराचे आकर्षण देशभरातील रामभक्तांना आहे. जानेवारीत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली आणि हे मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारने आता राज्यातील भाविकांना देखील अयोध्येला जाण्यासाठी असेच एक निमित्त दिले आहे. सरकार रामभक्तांना अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेता यावे म्हणून एसटी बस सुरू करण्याची तयारी करत आहे. रामभक्तांना पुण्यातून लालपरीने अयोध्येला जाता येणार आहे.

नागरिकांची होती मागणी
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील नागरिकांकडून अयोध्या बससेवा सुरू करण्याची मागणी केली जात होता. भाविकांची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य परिवहन मंडळाने पुणे-अयोध्या एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जर ४५ ते ५५ जणांचा एखादा समूह एकत्र प्रवास करणार असेल तर एसटीकडून खास बस सोडली जाणार आहे. या बातमीमुळे रामभक्तांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR