21.6 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रकफ सिरपमध्ये आढळल्या अळ्या

कफ सिरपमध्ये आढळल्या अळ्या

नंदुरबार : घरात लहान मुलांना सर्दी-खोकला झाला तर अनेकवेळा कफ सिरप दिले जाते. पण आत हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरताना दिसत आहे. कारण एका रुग्णालयात लहान मुलांना देण्यात येणा-या कफ सिरपमध्ये अळ्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आगे. तेथे लहान मुलांना देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये चक्क अळ्या आढळल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ जानेवारी रोजी खोकल्याच्या उपचारासाठी आलेल्या एका बालकाला कफ सिरप देण्यात आले होते. मात्र त्यामध्ये अळ्या आढळून आल्यानंतर संबंधितांनी ठाकरे गटाचे आमदार पाडवी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथे हे औषध लहान मुलांना दिलं जात असल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांनी सरकार आदिवासी बालकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी आले.

नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असल्याने आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवत असतात, परंतु जिल्हा प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत.

मात्र सरकार किंवा मंत्री याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे आदिवासींच्या जिवाचे काही मोल आहे की नाही, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. सातपुड्याच्या दुर्गम रागांमध्ये मदत संपलेल्या औषधी प्राथमिक केंद्रात सर्रास दिल्या जात असतात त्यातलाच हा एक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात औषध साठा गेला असेल तर तो सील करण्यात यावा व संबंधित कर्मचारी आणि पुरवठादारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार पाडवी यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR