22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरलातूर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

लातूर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

लातूर : प्रतिनिधी
निवडणुक आयोगाच्या निर्देशानूसार लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी दि. २३ जानेवारी रोजी लातूर जिल्ह्याची अंतीम मतदार यादी जाहीर केली. त्यानूसार जिल्ह्यामध्ये एकुण १९,४५,७७१ एवढे मतदार असून सर्वेक्षणानूसार यात १,७१,२५९ मतदारांचा  समावेश करण्यात आला आहे तर तब्बल ९१,१३९ मतदारांची  वगळणी करण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेस परिविक्षाधीन जिल्हाधिकारी गोयल, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, उपजिल्हा निवडणुक अधिकारी सुचिता शिंदे, उपजिल्हाधिकारी वाघमारे यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यंत्रणेद्वारे मतदारांचे सर्वेक्षण करुन एकुण १९,४,७७१ मतदार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने दुबार नावे, फोटो नसलेली, मयत झालेली नावे वगळण्यात आली आहेत. या मतदार यादीमध्ये १८ ते १९ वयोगटातील नव मतदारांची संख्या २७,५२८ एवढी वाढी आहे. जिल्ह्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये १८ मतदान केंद्रांची वाढ करण्यात आली असून एकुण २ हजार १०२ मतदान केंद्र एवढी संख्या जिल्ह्यामध्ये झाली आहे.  मतदार यादीच्या पडताळणीनंतर नव्याने मतदारांचा समावेश व वगळणीनंतर ७२,१२० एवढे मतदार वाढल्याचे निदर्शनास येत आहे. लातूर जिल्ह्याची अंतीम मतदार यादी घोषीत करण्यात आली असली तरी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीची प्रक्रिया ही निरंतर सुरुच राहणार आहे.
जिल्ह्यामध्ये शहरी भागात एका व ग्रामीण भागात का मतदार केंद्रावर कमी मतदार झाले होते. अशांची एकुण यादी काढून त्या त्या मतदार केंद्र परिसरात मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकसाठी आवश्यक असलेल्या मतदार मशीन (ईव्हीएम) लातूर जिल्ह्याला उपलब्ध झाल्या असून त्याची तपासणी करुन त्या गोदामामध्ये सुरक्षीत ठेवण्यात आल्या आहेत. त्यावर कडक पहाराही ठेवण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR