21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeसोलापूरदहिटणे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

दहिटणे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

सोलापूर : प्रभाग क्रमांक दोनमधील पंचशीलनगर, देवकीनगर, समर्थनगर येथे पिण्याची पाइपलाइन आणि ड्रेनेज लाइन घालणे कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या , हस्ते झाला. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून पंचशीलनगर येथे पिण्याची पाइपलाइन कामासाठी ठे १९ लाख रुपये तर देवकीनगर आणि समर्थनगर येथील ड्रेनेज कामासाठी १८ लाख रुपये मंजूर केले आहेत.

अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणेतून तर माजी नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे यांच्या भांडवली निधीतून पाच लाख रुपयांची विकासकामे होणार आहेत, अशी माहिती नगरसेवक तथा भाजपाचे सोलापूर सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे यांनी दिली. मा. नगरसेवक, युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. किरण देशमुख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेविका कल्पना कारभारी, बसवराज इटकळे, शंकर शिंदे, सचिन लड्डा, ज्ञानेश्वर कारभारी, प्रवीण कांबळे, संतोष मकाशे, रवी कोसगी, महेश दिक्कीत, संतोष मंठाळकर, बाबा शिंगाडे, बाळासाहेब राऊत, चंद्रकांत भक्ते, लक्ष्मण तानवडे, अनंत पाटील, विठ्ठल लोहार, महादेव जतकर, लक्ष्मण रणधरे, बालाजी गिरी, गुरूनाथ कोगणुरे, अविनाश जाबा, दीपक जाधव, संतोष धायगुडे, ज्ञानेश्वर बनसोडे, कुमार कांबळे, भैरवनाथ गायकवाड, दशरथ शिंगे, राहुल बनसोडे, परमेश्वर दत्तरगी आणि परिसरातील महिला उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR