35.9 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमनोरंजनदीपिकाला लाँच करणे रिस्क होती

दीपिकाला लाँच करणे रिस्क होती

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान आणि सध्याची आघाडीची अभिनेत्री असलेली दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असलेला ‘ओम शांती ओम’ हा सिनेमा २००७ साली प्रदर्शित झाला होता. थिएटरमध्ये हा सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमाबरोबरच त्यातील गाणीही सुपरहिट ठरली होती. दीपिकाने ‘ओम शांती ओम’मधूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आणि पहिल्याच सिनेमाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. ‘ओम शांती ओम’ची दिग्दर्शका असलेल्या फराह खानने आता सिनेमात दीपिकाला घेण्याबाबत वक्तव्य केलं आहे.

फराहने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘ओम शांती ओम’बद्दल भाष्य केलं. कांिस्टग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांना दिलेल्या मुलाखतीत फराह म्हणाली, “एका हिरोला (अभिनेत्याला) लाँच करणं ही वेगळी गोष्ट आहे. कारण तुम्हाला पैसै कोण देणार? मी दीपिकाला लाँच केलं कारण शाहरुख खान सिनेमात होता. म्हणून मी ही रिस्क घेऊ शकले.

दीपिकाला फँटाच्या जाहिरातीत पाहिलं तेव्हाच मला ही हिरोईन होणार हे माहीत होतं. हेमा मालिनीसारखी दिसणारी मुलगी मला हवी होती. मला तिच्यात ते दिसलं. तिचे उच्चार नीट नव्हते. पण, गाण्यांच्या वेळी तिचा चेहरा उजळून निघायचा. त्यामुळेच ‘ओम शांती ओम’मध्ये दीपिकाचे डायलॉग दुस-या आर्टिस्टकडून डब करण्यात आले होते असंही फराह खानने कोमल नाहताला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. ‘ओम शांती ओम’ सिनेमात शाहरुख आणि दीपिकाबरोबरच अर्जुन रामपाल, श्रेयस तळपदे, किरण खेर हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते. आजही हा सिनेमा आणि त्यातील गाणी तितकीच लोकप्रिय आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR